अर्जुन तेंडुलकरच्या निवडीमागचं सत्य आलं समोर

क्रिकेटचा देव मानला जाणाऱ्या सचिन तेंडुलकरच्या मुलाचं म्हणजेच अर्जुन तेंडुलकरचं अंडर - १६ क्रिकेटमध्ये निवड झाली... आणि यावर एकच चर्चा सुरू झाली. 

Updated: Jun 1, 2016, 06:34 PM IST
अर्जुन तेंडुलकरच्या निवडीमागचं सत्य आलं समोर title=

नवी दिल्ली : क्रिकेटचा देव मानला जाणाऱ्या सचिन तेंडुलकरच्या मुलाचं म्हणजेच अर्जुन तेंडुलकरचं अंडर - १६ क्रिकेटमध्ये निवड झाली... आणि यावर एकच चर्चा सुरू झाली. 

निवड समितीवर टीका...  

शालेय क्रिकेटमध्ये १००९ रन्सचा रेकॉर्ड करणाऱ्या प्रणव धनावडेला डावलून 'वेस्ट झोन अंडर-१६' क्रिकेट टीममध्ये अर्जुन तेंडुलकरची टीममध्ये निवड करण्यात आलीय, अशी टीका होत होती. 

...म्हणून करण्यात आली अर्जुनची निवड

परंतु, मिळालेल्या माहितीनुसार, अर्जुनची निवड त्याच्या परफॉर्मन्समुळे झाल्याचं स्पष्ट होतंय. 'पायडे ट्रॉफी'मध्ये दमदार खेळी खेळल्यामुळे अर्जुनची निवड करण्यात आल्याचं सांगण्यात येतंय. या टूर्नामेंटमध्ये, अर्जुननं एका सेन्चुरीशिवाय ४ विकेट घेतले होते. दुसरीकडे प्रणवनं मात्र ही टूर्नामेंट खेळलीच नव्हती. त्यामुळे त्याचं सिलेक्शन अंडर-१६ मध्ये करण्यात आलं नसल्याचं सांगितलं गंलय.