अॅडलेड : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिल्या क्रिकेट टेस्टमध्ये शुक्रवारी आक्रमकता दिसून आली. नो बॉलवर बोल्ड झालेल्या वॉर्नरला अंपायरने परत बोलविल्यानंतर डेव्हिड वॉर्नर आणि वरूण एरॉन यांच्यात बाचाबाची झाली.
ही घटना ३४ व्या षटकात झाली. जेव्हा विराटने एरॉनकडे बॉल दिला आणि एरॉनने वॉर्नरला बोल्ड केले त्यावेळी तो ६६ धावांवर खेळत होता. अंपायरने याला नो बॉल दिला आणि वॉर्नरला जीवनदान मिळाले.
वॉर्नर परतला आणि मैदानावर आनंद व्यक्त करणाऱ्या एरॉनकडे रागाने पाहिले. त्यानंतरचा चेंडून त्याने सोडून दिला. त्यानंतर वॉर्नर, एरॉन, शेन वॉटसन आणि शिखर धवन यांच्या बाचाबाची झाली. त्यानंतर अंपायरला मध्यस्थी करून हे प्रकरण सोडवावे लागले. त्यानंतरच्या चेंडूवर मिडऑनवर उभ्या असलेल्या शिखर धवनशी अंपायर इयान गूड हे बोलले आणि भारतीय कर्णधार विराट कोहलीने वॉर्नरला शांत करण्याचा प्रयत्न केला.
या पूर्वी फिलीप ह्युजेसच्या निधनामुले दोन्ही संघांनी संयम दाखवत खेळ केला होता. काल मिचेल जॉन्सनचा चेंडून विराटला लागल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी त्याची चौकशी केली होती. पण या आक्रामकतेने पुन्हा संयमी खेळात खंड पडला आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.