पुणे : रामकुमार रामनाथन आणि युकी भांब्री यांच्या विजयाच्या जोरावर भारताने रविवारी डेव्हिस कप टेनिस लढतीत न्यूझीलंडला ४-१ ने हरवले.
बालेवाडी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये रंगलेल्या रामकुमार आणि फिन टीअर्नी यांच्यातील सामन्यात रामकुमारने ७-५, ६-१, ६-० असा सरळ सेटमध्ये विजय मिळवला.
त्याच्या या विजयासोबत भारताचा विजय निश्चित झाला होता. त्यानंतर अनौपचारिक राहिलेल्या युकी भांब्री आणि जोस स्टेथन यांच्या लढतीत युकीने ७-५, ३-६, ६-४ असा विजय मिळवला.
न्यूझीलंडविरुद्ध विजय मिळवल्यानंतर भारतीय टेनिस संघाने झिंग झिंग झिंगाटवर जोरदार ताल धरला.