नवी दिल्ली : आयसीसीच्या महिला वर्ल्डकप २०१७च्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. संपूर्ण स्पर्धेत ३१ सामने खेळवले जाणार आहेत.
येत्या २४ जूनपासून महिला वर्ल्डकपला सुरुवात होत असून २३ जुलैला वर्ल्डकपमधील अंतिम सामना लॉर्ड्सच्या मैदानावर होणार आहे. रविवारी आयसीसीने या तारखांची अधिकृत घोषणा केली.
सामन्यांबाबतचे संपूर्ण वेळापत्रक ८ मार्चला जाहीर केले जाणार आहे. या स्पर्धेत आठ संघ आमनेसामने येतील. इंग्लंडमधील ब्रिस्टॉल, डर्बी, लेईस्टर आणि टाँटोन येथे हे सामने खेळवले जाणार आहेत.
स्पर्धेतील अव्वल ४ संघ सेमीफायनलमध्ये पोहोचतील. १८ जुलै ब्रिस्टॉल येथे पहिली सेमीफायनल तर २० जुलैला डर्बी येथे दुसरी सेमीफायनल होईल.
ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज हे संघ वर्ल्डकपसाठी आधीच पात्र ठरलेत. इतर संघासाठी पात्रता सामन्यांना ७ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. भारत, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, श्रीलंका, आर्यलंड, झिम्बाब्वे, थायलंड, बांगलादेश, स्कॉटलंड आणि पापुआ न्यू गिनीया हे संघ पात्रता फेरीत खेळतील. यातील चार संघ वर्ल्डकपसाठी पात्र ठरतील.