'चॅपेल सर्कसमधल्या रिंगमास्टरसारखे वागायचे' : सचिन

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आपल्या आत्मचरित्रात  भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक ग्रेग चॅपेल यांच्यावर बोचरी टीका केलीय. ग्रेग चॅपेल सर्कसमधल्या रिंगमास्टरसारखे वागायचे अशी असं सचिन तेंडुलकरने म्हटलं आहे.

Updated: Nov 3, 2014, 08:29 PM IST
'चॅपेल सर्कसमधल्या रिंगमास्टरसारखे वागायचे' : सचिन title=

मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आपल्या आत्मचरित्रात  भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक ग्रेग चॅपेल यांच्यावर बोचरी टीका केलीय. ग्रेग चॅपेल सर्कसमधल्या रिंगमास्टरसारखे वागायचे अशी असं सचिन तेंडुलकरने म्हटलं आहे.

शांत आणि संयमी क्रिकेटपटू म्हणून नावलौकीक असलेल्या सचिनने 'प्लेइंग इट माय वे' या आत्मचरित्रात मात्र, चॅपेल यांच्यावर घणाघाती टीका केल्याचे वृत्त पीटीआयने दिले आहे. तसेच यामध्ये चॅपेल हे खेळाडूंवर आपल्या कल्पना लादत असत, असा आरोपही सचिनने केला असल्याचे समजते. 

इतकेच नव्हे तर, २००७ सालचा विश्वचषक अगदी तोंडावर आलेला असताना चॅपेल यांनी राहुल द्रविडला कर्णधार पदावरून काढून माझ्याकडे संघाची जबाबदारी सोपविण्याचा धक्कादायक आणि निष्फळ प्रयत्न केल्याचा गौप्यस्फोटही सचिनने आत्मचरित्रात केल्याचे पीटीआयने म्हटले आहे.

सचिनचे आत्मचरित्र येत्या ६ नोव्हेंबरला जगभरात प्रकाशित होणार आहे. क्रीडा पत्रकार बोरिया मझुमदार या पुस्तकाचे सहलेखक आहेत. 

२००५ साली भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी निवड झालेल्या ग्रेग चॅपेल यांची कारकिर्द ही वादळी ठरली होती. चॅपेल आणि गांगुली यांच्यातील वादाचे खटकेही याआधी उघडकीस आले होते.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.