बांग्लादेशविरुद्धच्या एकुलत्या एक टेस्टसाठी भारत सज्ज

इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेतली विजयी परंपरा बांगलादेशविरुद्धच्या एकमेव कसोटीत कायम राहील, असा विश्वास टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळेनं व्यक्त केला आहे.

Updated: Feb 7, 2017, 10:52 PM IST
बांग्लादेशविरुद्धच्या एकुलत्या एक टेस्टसाठी भारत सज्ज  title=

हैदराबाद : इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेतली विजयी परंपरा बांगलादेशविरुद्धच्या एकमेव कसोटीत कायम राहील, असा विश्वास टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळेनं व्यक्त केला आहे. 9 तारखेपासून बांगलादेशविरुद्धची ही टेस्ट मॅच सुरु होणार आहे.

हैदराबादमध्ये भारतीय संघानं आज कसून सराव केला. घरच्या खेळपट्ट्यांवर भारतीय संघासाठी आतापर्यंतचा सिझन चांगला राहिलाय, त्यामुळे संघाचं मनोबल उंचावलं असल्याचंही कुंबळेंनी सांगितलं.

बांगलादेश संघानं न्यूझीलंड दौऱ्यात नुकतीच चांगली कामगिरी केलीये, त्यामुळे त्यांना कमी लेखून चालणार नाही, असा सल्लाही कुंबळेनं भारतीय टीमला दिला आहे.

बांगलादेशविरुद्धची एका मॅचची ही सीरिज कोहलीनं जिंकली तर तो धोनीचा विक्रमही मोडणार आहे. लागोपाठ 7 सीरिज जिंकण्याच्या धोनीच्या रेकॉर्डची कोहलीनं बरोबरी केली आहे. धोनीच्या आधी राहुल द्रविडनं लागोपाठ सहा सीरिज जिंकल्या होत्या.