टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना

भारतीय टीम ऑस्ट्रेलिया दौ-यावर रवाना झाली. मुंबईमधून टीम इंडिया रवाना झाली. .या दौ-यात टीम इंडिया ५ वन डे आणि ३ टी ट्वेंटी सामने खेळणार आहे. महेंद्रसिंग धोणीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाचा ऑस्ट्रेलियात कस लागेल. 

Updated: Jan 6, 2016, 08:37 AM IST
 टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना title=

नवी दिल्ली : भारतीय टीम ऑस्ट्रेलिया दौ-यावर रवाना झाली. मुंबईमधून टीम इंडिया रवाना झाली. .या दौ-यात टीम इंडिया ५ वन डे आणि ३ टी ट्वेंटी सामने खेळणार आहे. महेंद्रसिंग धोणीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाचा ऑस्ट्रेलियात कस लागेल. 

पर्थ, मेलबर्न आणि सिडनी या तीन ठिकाणी पहिल्या तीन वन डे खेळल्या जाणार आहेत. या तीनही ठिकाणच्या खेळपट्ट्या वेगवाग गोलंदाजांना साथ देणा-या आहेत. 

या तेजतर्रार खेळपट्ट्यांवर सर्व जलदगती गोलंदाज खेळवण्याची रणनिती ऑस्ट्रेलियाने आखली आहे. त्याला भारतीय फलंदाज आता कसं तोंड देतात याकडे लक्ष लागून राहीलंय. १२ जानेवारीला पहिली वनडे असणार आहे.