मुंबई: श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या 3 टी-20 मॅचच्या सीरिजसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आलीये. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावेळी तूफान फॉर्ममध्ये असणाऱ्या विराट कोहलीला या सीरिजसाठी विश्रांती देण्यात आली आहे. त्याच्याऐवजी टीममध्ये पवन नेगीचा समावेश करण्यात आला आहे. भारतात होणाऱ्या या सीरिजचं नेतृत्व धोनीच करणार आहे.
भारतीय संघ- एम.एस.धोनी (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, अजिंक्य रहाणे, मनिष पांडे, सुरेश रैना, युवराज सिंग, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, आर.अश्विन, जसप्रित बुमराह, आशिष नेहरा, हरभजन सिंग, भुवनेश्वर कुमार, पवन नेगी
9 फेब्रुवारीला पुण्यामध्ये पहिली टी-20 होणार आहे. तर 12 तारखेला दिल्लीमध्ये होणाऱ्या टी-20 ची जागा बदलून आता रांची करण्यात आली आहे. लंकेविरुद्धची तिसरी टी-20 14 तारखेला विशाखापट्टणममध्ये होईल.