रैनानं ट्विट केले मुलीचे फोटो

टीम इंडियाचा युवा फलंदाज आणि गुजरात लायन्सचा कर्णधार सुरेश रैनाला कन्यारत्न झाले आहे.

Updated: May 15, 2016, 08:53 PM IST
रैनानं ट्विट केले मुलीचे फोटो title=

मुंबई: टीम इंडियाचा युवा फलंदाज आणि गुजरात लायन्सचा कर्णधार सुरेश रैनाला कन्यारत्न झाले आहे. रैनानं आपल्या मुलीचे फोटो पहिल्यांदाच शेअर केले आहेत. ट्विटरवर सुरेश रैनानं तिचे फोटो ट्विट केले आहेत. 

आयपीएलमध्ये गुजरात लायन्स टीमचं नेतृत्व करत असलेला रैना बायकोच्या डिलिव्हरीसाठी आधीच हॉलंडला रवाना झाला आहे. यामुळे तो आयपीएलमध्ये खेळत नाहीये. 

पाहा रैनाच्या मुलीचे फोटो