तुला बघण्याची अजून वाट पाहू शकत नाही, माय लव्ह - रैना

संपूर्ण वर्ल्डकप टूर त्यानंतर झालं लग्न... लग्नानंतर लगेच टीम इंडियाचा नवविवाहित खेळाडू सुरेश रैना आपल्या पत्नीला सोडून आयपीएल खेळण्यात व्यस्त झाला.

Updated: May 21, 2015, 11:28 AM IST
तुला बघण्याची अजून वाट पाहू शकत नाही, माय लव्ह - रैना  title=

नवी दिल्ली: संपूर्ण वर्ल्डकप टूर त्यानंतर झालं लग्न... लग्नानंतर लगेच टीम इंडियाचा नवविवाहित खेळाडू सुरेश रैना आपल्या पत्नीला सोडून आयपीएल खेळण्यात व्यस्त झाला.

आपल्या सुंदर पत्नीची आठवण अनावर झाल्यानं सुरेश रैनानं अखेर काल रात्री आपल्या भावना ट्विटरवरून व्यक्त केल्या. रैनानं आपल्या पत्नी प्रियंकाचा फोटो शेअर करून 'आता तुला पाहण्यासाठी आणखी वाट पाहू शकत नाही, माय लव्ह', असं ट्विट केलंय.

वर्ल्डकपनंतर लगेच लग्न मग 8 एप्रिलपासून आयपीएलमध्ये बिझी झाल्यानं रैना आणि पत्नी प्रियंकाला दुरावा सहन करावा लागतोय. आयपीएलच्या बिझी शेड्यूल्डमुळे रैनाला देशभरात मॅच खेळाव्या लागत आहेत. त्यामुळं आपल्या नवविवाहित पत्नीपासून दूर राहावं लागतंय. रैना सर्वांसमोर आपल्या प्रेमाची कबुली दिली आणि पत्नीला किती मिस करत आहे, हे सांगितलं. 

चेन्नईची टीम उद्या शुक्रवारी रांचीमध्ये आपली दुसरी क्वॉलिफायर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध खेळणार आहे. यात जी टीम जिंकेल ती रविवारी मुंबई इंडियन्स विरुद्ध फायनलमध्ये खेळेल. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.