...म्हणून गावस्करांना धोनीच्या निर्णयाने आश्चर्य नाही वाटले

महेंद्रसिंग धोनीने बुधवारी वनडे आणि टी२०च्या कर्णधारपदावरुन पायउतार होण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाने संपूर्ण क्रिकेट जगताला धक्का बसला मात्र गावस्करांनी या निर्णय़ावर आश्चर्य व्यक्त केलेले नाही. 

Updated: Jan 5, 2017, 05:01 PM IST
...म्हणून गावस्करांना धोनीच्या निर्णयाने आश्चर्य नाही वाटले title=

नवी दिल्ली : महेंद्रसिंग धोनीने बुधवारी वनडे आणि टी२०च्या कर्णधारपदावरुन पायउतार होण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाने संपूर्ण क्रिकेट जगताला धक्का बसला मात्र गावस्करांनी या निर्णय़ावर आश्चर्य व्यक्त केलेले नाही. 

सुनील गावस्कर यांना आनंद आहे की धोनीने कर्णधारपदाचा राजीनामा दिला असला तरी तो संघात खेळत राहणार आहे. त्यांच्या मते धोनी अजूनही विकेटकीपिंगसह फलंदाजीत योगदान देऊ शकतो. 

गावस्करांनी एका न्यूज चॅनेलला दिलेल्या माहितीनुसार, जर धोनीने एक खेळाडू म्हणून निवृत्ती घेतली असती तर त्याच्या घरासमोर आंदोलन करणारा मी पहिला व्यक्ती असतो. एक क्रिकेटर म्हणून आजही धोनी आक्रमक फलंदाज आहे. एका षटकांत सामन्याचा निकाल बदलण्याची ताकद धोनीमध्ये आहे. एक चांगला फलंदाज म्हणून संघाला त्याची गरज आहे. मला आनंद आहे की तो क्रिकेटर म्हणून संघात राहणार आहे. 

धोनीने कर्णधारपद सोडल्याने त्याला फलंदाजी आणि विकेटकीपिंगमध्ये मदत होईल. ते पुढे म्हणाले, विराट कोहली निश्चितपणे धोनीला चार अथवा पाचव्या नंबरवर फलंदाजीसाठी पाठवेल. कारण त्यानंतर त्याला फलंदाजीला पाठवण्याचा काही अर्थ राहणार नाही. तो फिनिशर आबे मात्र चौथ्या अथवा पाचव्या क्रमांकावर उतरुनही तो चांगली फलंदाजी करु शकतो.