सचिनने उलगडलं मुंबई इंडियन्सच्या विजयाचं रहस्य

मुंबई इंडियन्सचा मेंटर सचिन तेंडूलकरनं आयपीएलमध्ये त्यांचा टीमच्या यशाचं रहस्य 'कठिण परिस्थिती संघटित राहणं' हे आहे, असं सांगितलं.

Updated: May 25, 2015, 01:18 PM IST
सचिनने उलगडलं मुंबई इंडियन्सच्या विजयाचं रहस्य title=

मुंबई: मुंबई इंडियन्सचा मेंटर सचिन तेंडूलकरनं आयपीएलमध्ये त्यांचा टीमच्या यशाचं रहस्य 'कठिण परिस्थिती संघटित राहणं' हे आहे, असं सांगितलं.

आयपीएलच्या अंतिम सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू हेडनशी बोलतांना सचिननं सांगितलं की, 'एकमेकांसोबत राहणं खूप मजेशीर असतं. आम्ही एकत्रितपणे काम करतो, खूप मेहनत करतो आणि प्लानिंनप्रमाणे खेळतो. हे खूप महत्वाचं असतं की, तुम्ही कठिण समयी कसे एकत्र राहता.'

हेडननं मस्करीत तेंडुलकरला विचारलं की, आयपीएलमध्ये पुनरागमन करणार का? त्यावर सचिननं लगेच उत्तर दिलं की 'नाही.'

तेंडुलकरनं असे संकेत दिले की, 'ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू शेन वॉर्नसोबत अमेरिकेत लिजेंड्स टी-२० सुरू करण्याची योजना आहे. त्यामुळं आम्हीही कदाचित काही मॅच खेळतांना दिसू शकू.'

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.