मुंबई : सनराइजर्स हैदराबादला आयपीएलच्या प्ले-ऑफमध्ये जागा बनवता आली नाही, मात्र हैदराबादचा कर्णधार डेविड वॉर्नर सर्वाधिक रन करत ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला आहे. आयपीएलची उपविजेता टीम चेन्नई सुपरकिंग्सचा ऑलराऊंडर ड्वेन ब्रावोनं सर्वाधिक विकेट घेत पर्पल कॅप आपल्या नावे केली आहे.
वॉर्नरने १४ मॅचमध्ये सात अर्धशतकांच्या मदतीने ४३.२३ च्या सरासरीनं ५६२ रन केले. वॉर्नरनंतर राजस्थान रॉयलच्या अजिंक्य रहाणेनं ५४० रन, मुंबई इंडियन्सच्या लेंडल सिमंसनं ५४० रन, रॉयल चॅलेन्जर्सच्या एबी डिविलिअर्सनं ५१३ रन आणि विराट कोहलीनं ५०५ रन केले.
चेन्नई सुपरकिंग्सच्या ड्वेन ब्रावोनं १७ मॅचेसमध्ये १६.३८च्या सरासरीनं सर्वाधिक २६ विकेट घेतल्या. त्यानंतर मुंबईच्या लसिथ मलिंगानं २४, रॉयल चॅलेन्जर्सच्या युजवेंद्र चाहलनं २३, चेन्नईच्या आशिष नेहरानं २२ आणि रॉयल चॅलेंजर्सच्या मिशेल स्टार्कनं २० विकेट घेतल्या.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.