नवी दिल्ली : पूरग्रस्त चेन्नईला मदत करण्यासाठी केवळ भारतीयच नव्हे तर श्रीलंकेचे क्रिकेटपटूही पुढे सरसावलेत. श्रीलंकेच्या दोन माजी क्रिकेटपटूंना चेन्नई पूरग्रस्तांना मदत जाहीर केली. श्रीलंकेचा माजी फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन याने एक कोटी रुपयांची मदत जाहीर केलीय. तर नुकतीच निवृत्ती घेतलेला श्रीलंकेचा क्रिकेटपटू कुमार संगकाराने ६५ लाख रुपयांची मदत जाहीर केलीय.
भारताचा वनडे कर्णधार महेंद्रसिंग धोनीनेही पूरग्रस्त पिडीतांना ७५ लाख रुपये मदतीची घोषणा केलीय. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दौऱ्यात खेळत असलेले रविचंद्रन अश्विन आणि मुरली विजय यांनीही पुरामध्ये बळी मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांबाबत शोक व्यक्त केला.
चेन्नईच्या पुरामुळे राज्यातील तब्बल २४५हून अधिकांचा बळी गेलाय. तेथील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय. लष्कराचे पथक आणि एनडीआरएफच्या पथकाकडून मदतकार्य सुरु आहे. लाखो लोकांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आलेय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.