मुंबई : इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स मॅनेजमेंटमार्फत स्पोर्ट्स हिरोज या नावानं राष्ट्रगीताचं अनावरण सचिन तेंडुलकरच्या हस्ते करण्यात आलं.
या स्पोर्ट्स हिरोज राष्ट्रगीतामध्ये देशातील दिग्गज खेळाडूंचा सहभाग आहे. सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर, सुशील कुमार, धनराज पिल्ले, सानिया मिर्झा, महेश भूपती, गगन नारंग, बायचुंग भुतिया या खेळाडूंचा या राष्ट्रगीतामध्ये सहभाग आहे.
या राष्ट्रगीताचं दिग्दर्शनं अभिजित पानसे यांनी केलं असून याद्वारे मुला-मुलींना खेळाकडे वळवण्याच्या उद्देशानं या राष्ट्रगीताचं अनावरण करण्यात आलय. माजी क्रिकेटर निलेश कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून ही कल्पना साकारलीय. यावेळी सचिननं मैदानावर असताना राष्ट्रगीतामुळे आपण कसं भारावून जात असे याच्या आठवणी सांगितल्या.