पिचमुळे कदाचित अश्विनला एक ओव्हर देण्यात आली - रहाणे

वानखेडेच्या मैदानावर आयपीएलच्या पदार्पणातच रायजिंग पुणे सुपरजायटंसने गतविजेत्या मुंबई इंडियन्स संघावर विजय मिळवत दणक्यात सुरुवात केली. 

Updated: Apr 10, 2016, 04:17 PM IST
पिचमुळे कदाचित अश्विनला एक ओव्हर देण्यात आली - रहाणे title=

मुंबई : वानखेडेच्या मैदानावर आयपीएलच्या पदार्पणातच रायजिंग पुणे सुपरजायटंसने गतविजेत्या मुंबई इंडियन्स संघावर विजय मिळवत दणक्यात सुरुवात केली. 

या संपूर्ण सामन्यात स्पिनर आर. अश्विनला केवळ एक ओव्हर देण्यात आली. वानखेडेची पिच वेगवान गोलंदाजांसाठी पोषक होती. त्यामुळेच कदाचित अश्विनला एक ओव्हर देण्यात आल्याचे सामना संपल्यानंतर रहाणेने सांगितले. 

'अश्विनला सामन्यात १६वी ओव्हर देण्यात आली होती. याचे कारण माहीत नाही. कर्णधाराला याची माहिती असेल. वेस्ट इंडिजविरुद्धच्या सेमीफायनलच्या सामन्यात वेगळी पिच होती. तसेच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाचव्या वनडे सामन्यातही वेगळी पिच होती. '

'यावेळची पिच वेगवान गोलंदाजांसाठी पोषक होती. अश्विन चांगला गोलंदाज आहे. विकेट घेणे आणि रन्स न देणे महत्त्वाचे होते. अश्विनने पहिल्याच चेंडूत अंबाती रायडूची विकेट घेतली आणि त्याने संपूर्ण ओव्हरमध्ये केवळ सात धावा दिल्या,' असे रहाणे म्हणाला.