आम्हाला, भारताविरुद्धचा पराभव विसरायचाय - हाशिम आमला

दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटर हाशिम आमला यानं भारतासोबतची मॅच विसरुन पुढे जाण्याचा सल्ला आपल्या साथीदारांना दिलाय. 

Updated: Feb 25, 2015, 05:53 PM IST
आम्हाला, भारताविरुद्धचा पराभव विसरायचाय - हाशिम आमला title=

मुंबई : दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटर हाशिम आमला यानं भारतासोबतची मॅच विसरुन पुढे जाण्याचा सल्ला आपल्या साथीदारांना दिलाय. 

भारताविरुद्ध झालेल्या मॅचमध्ये झालेल्या दारुण पराभवानंतर दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडुंच्या आत्मविश्वासाला तडा गेलाय. पण, हा पराभव विसरुन वर्ल्डकपमध्ये शुक्रवारी होणाऱ्या मॅचवर लक्ष केंद्रीत करण्याचा आग्रह आमलानं आपल्या सहकाऱ्यांना केलाय. 

महत्त्वाचं म्हणजे, दक्षिण आफ्रिकेला वर्ल्डकपच्या खिताबाचा प्रबळ दावेदार मानलं जातंय. पण, गेल्या आठवड्यात भारतासमोर १३० रन्सनं त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. वर्ल्डकपमध्ये हा अत्यंत वाईट परफॉर्मन्स होता. 

'आता भारताविरुद्धच्या पराभवाला जास्त महत्त्व देता काम नये.... मॅचमध्ये एकच टीम जिंकणार आहे. त्यामुळे, याबद्दल कुणीही त्रास करून घेऊ नये... निश्चित स्वरुपात आम्ही निराश झाले आहोत... कारण आम्ही चांगला खेळ करू शकलो नाहीत. पण, आम्हाला माहीत आहे राऊंड रोबिनमध्ये आम्हाला राऊंड रोबिनमध्ये आणखीही काही मॅच खेळायच्यात.... आणि खेळाडूही चांगली कामगिरी करत आहेत. त्यामुळे, भारतासोबतची मॅच आम्हाला विसरून आम्हाला पुढच्या मॅचमध्ये चांगली कामगिरी करायचीय' असं हाशिम आमलानं म्हटलंय. 

शुक्रवारच्या मॅचपूर्वी हा चांगला धडा आम्हाला मिळालाय. त्यामुळे आपली टीम वेस्ट इंडिजविरुद्ध कोणतीही कसर बाकी ठेवणार नाही... वेस्ट इंडिजही टीम अत्यंत आक्रमक आहे त्यांच्याविरुद्ध आमचा विजय पक्का मानता येणार नाही. आम्ही त्यांना तोच सन्मान देऊ जो आत्तापर्यंत आम्ही इतर टीम्सना दिलाय, असंही आमलानं स्पष्ट केलंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.