'सौरव गांगुलीच सर्वोत्तम कॅप्टन'

सौरव गांगुली आणि महेंद्रसिंग धोनी या दोघांनी त्यांच्या नेतृत्वामध्ये भारताला ऐतिहासिक विजय मिळाले.

Updated: Sep 11, 2016, 08:37 PM IST
'सौरव गांगुलीच सर्वोत्तम कॅप्टन' title=

मुंबई : सौरव गांगुली आणि महेंद्रसिंग धोनी या दोघांनी त्यांच्या नेतृत्वामध्ये भारताला ऐतिहासिक विजय मिळाले. या दोघांमध्ये सर्वोत्तम भारतीय कॅप्टन कोण याविषयी नेहमीच चर्चा होते. या दोघांच्या नेतृत्वाखाली खेळलेले अनेक दिग्गज खेळाडू याविषयी गोल गोल उत्तरं देतात, तर काही जण या प्रश्नाबद्दल उत्तर देणंच टाळतात. 

युवराज सिंगनं मात्र या प्रश्नाचं थेट उत्तर दिलं आहे. रेडियो मिरचीच्या एका कार्यक्रमात युवराजला हाच प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा सौरव गांगुलीच सर्वोत्तम कॅप्टन असल्याचं युवराज म्हणाला आहे. 

माझ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात सौरव गांगुली कॅप्टन असताना झाली. गांगुलीनं मला, आशिष नेहरा, सेहवाग, झहीर खान आणि हरभजनला नेहमीच पाठिंबा दिला, अशी प्रतिक्रिया युवीनं दिली आहे.