भारत इंग्लंडविरुद्ध निर्भेळ यश मिळवेल - गांगुली

भारत आणि इंग्लंडदरम्यान सुरु होणाऱ्या कसोटी मालिकेबाबत भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने भविष्यवाणी केलीये.

Updated: Nov 4, 2016, 10:21 AM IST
भारत इंग्लंडविरुद्ध निर्भेळ यश मिळवेल - गांगुली title=

नवी दिल्ली : भारत आणि इंग्लंडदरम्यान सुरु होणाऱ्या कसोटी मालिकेबाबत भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने भविष्यवाणी केलीये.

येत्या 9 नोव्हेंबरपासून भारत आणि इंग्लंड यांच्या कसोटी मालिका सुरु होतेय. या मालिकेत पाच कसोटी सामने होतील. पहिली कसोटी राजकोट येथे होणार आहे. 

भारतीय संघ या मालिकेत 5-0ने निर्भेळ यश मिळवेल अशी आशा सौरव गांगुलीने व्यक्त केलीये. भारतीय संघ सध्या चांगल्या फॉर्मात आहे. त्यांचा हा फॉर्म पाहता आगामी इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत भारत इंग्लंडला 5-0 ने हरवेल अशी आशा आहे, असे सौरव म्हणाला. 

याआधी न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताने निर्भेळ यश मिळवले होते.