वर्ल्ड कप २०१५ मधील काही अजब आकडे

Updated: Mar 27, 2015, 05:01 PM IST

मुंबई : भारत वर्ल्ड कपमधून बाहेर झाला असला तरी वर्ल्ड कप कोणाचा होईल ही उत्सुकता सर्वांनाच आहे. या वर्ल्ड कपमध्ये अनेक रेकॉर्ड झाले. कोणी जास्त रन केले, कोणी जास्त विकेट घेतल्या, कोणी जास्त शतके ठोकली इत्यादी गोष्टी सर्वांनाच माहीत असतील. मात्र जर विचारलं सर्वात जास्त डॉट बॉल कोणी घालवले तर कदाचित माहीत नसेल.

सर्वात जास्त डॉट बॉल घालवण्यामध्ये आघाडीवर आहे, अफगाणिस्तानचा समीउल्लाह शेनवरी. त्याने वर्ल्ड कपमध्ये एकूण २९१ डॉट बॉल घालवले. त्याच्यानंतर, 
- पाकिस्तानच्या मिसबाह-उल-हकने २५१ डॉट बॉल घालवले. 
- आयर्लंडच्या व्हिल्लिअम पोर्टरफिल्डने २४७ डॉट बॉल घालवले. 
- न्यूझीलंडच्या मार्टिन गुप्टिलने २४२ डॉट बॉल घालवले. 
- बांगलादेशच्या महमदुल्लाह रियादने २३३ डॉट बॉल घालवले.
- श्रीलंकेच्या कुमार संगकाराने २२५ डॉट बॉल घालवले.
- दक्षिण आफ्रिकेच्या डु प्लेसीसने २१३ डॉट बॉल घालवले.
- भारताच्या शिखर धवनने २११ डॉट बॉल घालवले.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.