सर रविंद्र जडेजानं गुपचूप केला साखरपुडा

टीम इंडियाचा आणखी एक बॅचलर ऑफिशिअली एंगेज झालाय. सर रविंद्र जडेजानं साखरपुडा केलाय. या बातमीमुळं त्याच्या तमाम महिला चाहत्यांचा हिरमोड होईल.

Updated: Jul 16, 2014, 07:12 PM IST
सर रविंद्र जडेजानं गुपचूप केला साखरपुडा title=

कोलकाता: टीम इंडियाचा आणखी एक बॅचलर ऑफिशिअली एंगेज झालाय. सर रविंद्र जडेजानं साखरपुडा केलाय. या बातमीमुळं त्याच्या तमाम महिला चाहत्यांचा हिरमोड होईल.

चेतना नावाच्या या मैत्रिणीबरोबर जडेजाचा साखरपुडा झालाय. काही दिवसांपूर्वी जडेजा जयपूरमध्‍ये एका अनोळखी मुलीबरोबर टीम बसमध्‍ये आढळला होता. ती मुलगी म्हणजेच चेतना... 

मिळालेल्या माहितीनुसार ती त्‍याची नियोजित वधू चेतना आहे. जडेजाला वेस्‍ट इंडीजविरूद्धच्‍या मालिकेसाठी विश्रांती देण्‍यात आली आहे. तो दक्षिण आफ्रिकेच्‍या दौऱ्यासाठी उपलब्‍ध असेल. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.