सिंधू भविष्यात चांगली कामगिरी करेल - सिंधूचे वडील

भारताची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूनं इतिहास रचलाय. सिंधूनं भारताला ऑलिम्पिकमध्ये सिल्व्हर मेडलची कमाई करुन दिली आहे. सिंधूचं गोल्ड मेडल थोडक्यात हुकलं. मात्र ऑलिम्पिकमध्ये सिल्व्हर पटकावणारी ती पहिली भारतीय महिला ठरली आहे.

Updated: Aug 20, 2016, 09:03 AM IST
सिंधू भविष्यात चांगली कामगिरी करेल - सिंधूचे वडील title=

मुंबई : भारताची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूनं इतिहास रचलाय. सिंधूनं भारताला ऑलिम्पिकमध्ये सिल्व्हर मेडलची कमाई करुन दिली आहे. सिंधूचं गोल्ड मेडल थोडक्यात हुकलं. मात्र ऑलिम्पिकमध्ये सिल्व्हर पटकावणारी ती पहिली भारतीय महिला ठरली आहे.

फायनलमध्ये तिला स्पेनच्या वर्ल्ड नंबर वन कॅरोलिना मरिननं 19-21, 21-12, 21-15नं पराभूत केलं. सिंधूला भले गोल्ड मेडलनं हुलकवाणी दिली असेल. मात्र सिंधूंनं ऑलिम्पिकमध्ये ज्या कामगिरीचं दर्शन घडवलं आणि तिनं मरीनला जी टक्कर दिली ते पाहता सिंधूनं सा-या भारतीयांना प्रभावित केलं. भारतीय महिला खेळाडूंना आतापर्यंत सिल्व्हर मेडलची कमाई करता आली नव्हती ती सिंधूनं करुन दाखवली.

सिंधूला जरी गोल्ड मेडलवर नाव कोरता आलं नसलं तरी सिंधू भविष्यात पी. गोपीचंद यांच्या कोचिंगखाली चांगली कामगिरी करेल असा विश्वास सिंधूच्या वडिलांनी व्यक्त केला आहे.