सानियाचं शोएबच्या जीवनातील स्थान काय? पाहा, शोएबच्याच शब्दांत...

पाकिस्तानचा सीनिअर क्रिकेटर आणि ऑलराऊंडर खेळाडू शोएब मलिकनं आपल्या करिअरला एक नवं जीवन देण्याचं श्रेय आपली पत्नी आणि भारतीय टेनिस खेळाडू सानिया मिर्झा हिला दिलंय. 

Updated: Aug 20, 2015, 04:18 PM IST
सानियाचं शोएबच्या जीवनातील स्थान काय? पाहा, शोएबच्याच शब्दांत... title=

कराची : पाकिस्तानचा सीनिअर क्रिकेटर आणि ऑलराऊंडर खेळाडू शोएब मलिकनं आपल्या करिअरला एक नवं जीवन देण्याचं श्रेय आपली पत्नी आणि भारतीय टेनिस खेळाडू सानिया मिर्झा हिला दिलंय. 

सानियाची अखंड मेहनत, तिची बांधिलकी आणि एक व्यावसायिक खेळाडू म्हणून मिळवलेलं यश याच गोष्टींमुळे मी माझ्या खेळात सुधारणा करण्यासाठी प्रोत्साहित झालो आणि यशस्वीपणे कमबॅक करू शकलो, असं शोएबनं म्हटलंय. 

दौऱ्यांवर असताना सानिया खूप सहजपणे खेळण्यास प्रोत्साहित करते... जेव्हा मला हवं असतं तेव्हा ती माझ्याशी क्रिकेटविषयी चर्चाही करते. अनेकदा तुम्ही तुमच्या टीमच्या खेळाडुंसोबत काही गोष्टी बोलू शकत नाही... तुमचे विचार, जाणीवा सांगू शकत नाही... पण, मी खूप भाग्यशाली आहे की माझ्यासोबत सानिया आहे. ती मला खूप सहजता देते जेव्हा मी खेळाडू म्हणून तिच्यासोबत चर्चा करू शकतो आणि चांगले सल्लेही घेऊ शकतो. असं शोएबनं म्हटलंय. 

'मला माहीत आहे की आपल्या यशासाठी तिनं किती कठोर मेहनत घेतलीय... आणि तीचे हेच गुण मला क्रिकेट खेळण्यासाठी प्रेरित करतात. हेच कारण आहे की मी पाकिस्तान टीममध्ये यशस्वी कमबॅक करू शकलो... आणि यामुळे मी खूप खूश आहे' असं म्हणत शोएबनं आपल्या जीवनातील सानियाचं स्थान अधोरेखित केलंय. 

आपल्या पत्नीचं टेनिसमधलं यशाचंही आपण खूप आदर करतो, कारण हा व्यक्तिगत खेळ आहे, असंही शोएबनं म्हटलंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.