'पैशांसाठी तो भारतीय खेळाडूंची स्तुती करतो'

पाकिस्तानचा माजी फास्ट बॉलर शोएब अख्तर सध्या भारतीय संघाच्या कामगिरीवर भलताच खुश आहे.

Updated: Mar 6, 2016, 05:39 PM IST
'पैशांसाठी तो भारतीय खेळाडूंची स्तुती करतो' title=

मुंबई: पाकिस्तानचा माजी फास्ट बॉलर शोएब अख्तर सध्या भारतीय संघाच्या कामगिरीवर भलताच खुश आहे. पण याच मुद्द्यावरून भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागनं शोएबला लक्ष्य केलं आहे. भारतामध्ये येऊन शोएबला कॉमेंट्रीकरून पैसा कमवायचा आहे, म्हणून तो भारतीय खेळाडूंचं एवढं कौतुक करतो असं सेहवाग म्हणाला आहे. 

पैशांसाठी माणूस काहीही करू शकतो. मी जेव्हा शोएबविरुद्ध खेळायचो तेव्हा तो कधीच आमचं कौतुक करायचा नाही, अशी प्रतिक्रिया सेहवागनं दिली आहे.

 पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू मोहम्मद युसुफ, शकलेन मुश्ताक आणि राणा नावेद उल हसन पाकिस्तानमधल्या न्यूज चॅनलवर क्रिकेट एक्सपर्ट्स म्हणून जातात.  भारतातल्या न्यूज चॅनलनं त्यांना एक लाख रुपये दिले तर तेच पाकिस्तानी चलनाच्या तुलनेत 2 लाख रुपये होतात. त्यामुळे त्यांनाही भारतात यायचं आहे, असं सेहवाग म्हणाला आहे.