ज्युनियर गब्बरचा तुम्ही हा व्हिडीओ पाहिलाय का?

भारताचा सलामीवीर शिखर धवनला भारतीय संघात गब्बर असे म्हटले जाते. त्याच्या मिशांमुळे त्याला मिळालेलं हे नावं योग्यच वाटंत. सध्या भारतीय संघ टी-२० मध्ये व्यस्त आहे. मात्र त्यातूनही वेळ काढून शिखर धवनने आपल्या मुलाचा व्हिडीओ शेअर केलाय.

Updated: Mar 22, 2016, 11:02 AM IST
ज्युनियर गब्बरचा तुम्ही हा व्हिडीओ पाहिलाय का? title=

नवी दिल्ली : भारताचा सलामीवीर शिखर धवनला भारतीय संघात गब्बर असे म्हटले जाते. त्याच्या मिशांमुळे त्याला मिळालेलं हे नावं योग्यच वाटंत. सध्या भारतीय संघ टी-२० मध्ये व्यस्त आहे. मात्र त्यातूनही वेळ काढून शिखर धवनने आपल्या मुलाचा व्हिडीओ शेअर केलाय.

यात शिखरचा मुलगा जॉनी जॉनी येस पापा ही कविता म्हणताना दिसतोय. माझा मुलगा पहिल्यांदा कविता म्हणतोय. माझ्या जीवनातील सुंदर क्षण आहे. या क्षणाने माझ्या चेहऱ्यावर हसू आणले असं शिखरने ट्विट केलंय.