शशांक मनोहर पुन्हा होणार बीसीसीआय अध्यक्ष

'मिस्टर क्लिन' म्हणून ओळखले जाणारे शशांक मनोहर पुन्हा बीसीसीआय अध्यक्षपदी विराजमान होऊ शकतात. मनोहर यांची निवड दवळपास निश्चित मानली जातेय. शिवाय शरद पवार आणि अनुराग ठाकूर दोन्ही गटांचा शशांक मनोहर यांना पाठिंबा आहे. 

Updated: Sep 27, 2015, 10:26 AM IST
शशांक मनोहर पुन्हा होणार बीसीसीआय अध्यक्ष title=

नवी दिल्ली: 'मिस्टर क्लिन' म्हणून ओळखले जाणारे शशांक मनोहर पुन्हा बीसीसीआय अध्यक्षपदी विराजमान होऊ शकतात. मनोहर यांची निवड दवळपास निश्चित मानली जातेय. शिवाय शरद पवार आणि अनुराग ठाकूर दोन्ही गटांचा शशांक मनोहर यांना पाठिंबा आहे. 

दालमिया यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठी शशांक मनोहर दोन्ही गटाच्या पसंतीचे उमेदवार ठरले आहे.

आणखी वाचा - बीसीसीआय अध्यक्ष जगमोहन दालमिया यांनी केले नेत्रदान

बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितले की, 'केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आणि अनुराग ठाकूर यांनी मनधरणी केल्यानंतर मनोहर पुन्हा एकदा अध्यक्षपद स्वीकारण्यास तयार झाले आहेत. पवार यांनी दुजोरा दिला तर मनोहर यांची निवड निश्चित आहे.'

ठाकूर आणि पवार गट एकत्र आले तर मनोहर यांना २९ पैकी १५ मतं मिळणं निश्चित आहे. अध्यक्षपदाची निवडणूक जिंकण्यासाठी ही संख्या पुरेशी आहे. या समीकरणामुळं श्रीनिवासन यांच्या आपल्या पसंतीच्या उमेदवाराला अध्यक्षपदी विराजमान करण्याच्या आशा जवळजवळ संपुष्टात आल्या आहेत. 

आणखी वाचा - जगमोहन दालमिया यांचे निधन

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.