शेन वॉर्नला चावला ऍनाकोंडा

ऑस्ट्रेलियाचा लेग स्पिनर शेन वॉर्नला ऍनाकोंडा चावला आहे.

Updated: Feb 18, 2016, 01:09 PM IST
शेन वॉर्नला चावला ऍनाकोंडा title=

मुंबई: ऑस्ट्रेलियाचा लेग स्पिनर शेन वॉर्नला ऍनाकोंडा चावला आहे. शेन वॉर्नच्या डोक्याचा ऍनाकोंडानं चावा घेतला आहे. 

शेन वॉर्न आय एम अ सेलिब्रिटी... गेट मी आऊट ऑफ हिअर या रियालिटी शो मध्ये शेन वॉर्न सहभागी झाला आहे. यातलाच एक टास्क म्हणून ऍनाकोंडांनी भरलेल्या एका बॉक्समध्ये शेन वॉर्नला डोकं घालावं लागलं

. 

याआधीच्या टास्कमध्ये शेन वॉर्नच्या डोळ्याला पट्टी बांधण्यात आली आणि त्याला उंदरांनी भरलेल्या बॉक्समध्ये डोकं घालायला लावलं, त्यानंतर त्यानं ऍनाकोंडानी भरलेल्या बॉक्समध्ये डोकं घातलं, पण ऍनाकोंडाला वॉर्नच्या अंगाचा उंदराचा वास आला, आणि त्यानं शेन वॉर्नवर हल्ला केला. 

सुदैवानं हा ऍनाकोडां बिनविषारी असल्यानं अनर्थ टळला. पण शेन वॉर्नच्या डोक्याला दुखापत झाली आहे. त्याच्यावर डॉक्टरांचे उपचार सुरु आहेत. 

पाहा ऍनाकोंडाच्या हल्ल्याचा व्हिडिओ