वीरुचा खेळण्याबाबत महत्त्वाचा निर्णय...

सध्या भारतीय टीममधून बाहेर असणारा बॅटसमन वीरेंद्र सेहवाग स्थानिक सत्रात दिल्लीऐवजी हरियाणाकडून खेळण्याचा निर्णय घेतलाय. 

Updated: Aug 22, 2015, 09:53 PM IST
वीरुचा खेळण्याबाबत महत्त्वाचा निर्णय...  title=

फरीदाबाद : सध्या भारतीय टीममधून बाहेर असणारा बॅटसमन वीरेंद्र सेहवाग स्थानिक सत्रात दिल्लीऐवजी हरियाणाकडून खेळण्याचा निर्णय घेतलाय. 

वर्ष १९९७-९८ पासून १८ सीझन सेहवागनं आत्तापर्यंत दिल्लीकडून खेळलेत. हाच सेहवाग आता हरियाणाकडून खेळताना दिसणार आहे. सेहवागला काही दिवसांपूर्वीच दिल्लीकडून एनओसी मिळालीय. 

या सीझनमध्ये हरिणायाकडून खेळण्यासाठी उत्सुक असल्याचं सेहवागनं म्हटलंय. तरुणांनी भरलेल्या टीमसोबत ड्रेसिंगरुममध्ये आणखीनच चांगला अनुभव राहील. मी माझे अनुभवही त्यांच्यासोबत शेअर करू शकेन. 

वीरूनं या सत्रात आमच्या राज्याच्या संघाचं प्रतिनिधित्व करण्याचा निर्णय घेतलाय, असं म्हणत एचसीएच अध्यक्ष अरविंद चौधरी यांनीही याबद्दल आनंद व्यक्त केलाय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.