WWE मध्ये येणार दुसरा भारतीय

भारतात ज्याचे अनेक चाहते आहेत त्या दलीप सिंग राणा म्हणजेच द ग्रेट खलीचा भारतीय वारसदार आता WWE मध्ये आला आहे. 

Updated: Jan 15, 2016, 09:06 PM IST
WWE मध्ये येणार दुसरा भारतीय title=

नवी दिल्ली : भारतात ज्याचे अनेक चाहते आहेत त्या दलीप सिंग राणा म्हणजेच द ग्रेट खलीचा भारतीय वारसदार आता WWE मध्ये आला आहे. 

सतेंदर डगर असे त्याचे नाव आहे. ६.४ फूट उंची आणि १०६ किलो वजन असलेला सतेंदर हरीयाणातल्या सोनिपत जिल्ह्यातील बगरु या खेड्यात राहणारा असून  WWE मध्ये जाणारा तो दुसरा भारतीय ठरला आहे. सतेंदरने WWE सोबत तीन वर्षांचा करार केल्याची माहिती मिळत आहे.

 

विशेष म्हणजे WWE चा शो १५ आणि १६ जानेवारीला भारतात दिल्लीत होणार आहे आणि तेव्हाच सतेंदर त्याच्या WWE कारकीर्दीतला पहिला सामना खेळणार आहे. खरं तर त्याचा पहिला सामना जॉन सिनाशी होणार होता. पण आता दुखापतीमुळे जॉन भारतात येणार नाही. 

सतेंदर तिनदा 'हिंद केसरी' किताबाचा मानकरी राहिला असून WWEमध्ये जाण्याआधी गेल्यावर्षी त्याने दुबईत ६० मल्लांचा पराभव केला होता.

WWEतून कमावलेल्या पैशांतून हरीयाणात एक रेसलिंग स्कूल काढण्याचा सतेंदरचा मानस आहे