व्हिडीओ | फिल ह्युजेस डोक्याला गंभीर दुखापत

ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमला मोठा हादरा बसला आहे. धडकाकेबाज फलंदाज फिल ह्युजेस यांच्या डोक्यावर बॉल आदळल्यानं तो मैदानावरच कोसळला. हेल्मेट असताना सुद्धा तो जायबंदी झालाय. त्याची स्थिती गंभीर झाली आहे.

Updated: Nov 26, 2014, 11:18 AM IST
व्हिडीओ | फिल ह्युजेस डोक्याला गंभीर दुखापत title=

सिडनी : ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमला मोठा हादरा बसला आहे. धडकाकेबाज फलंदाज फिल ह्युजेस यांच्या डोक्यावर बॉल आदळल्यानं तो मैदानावरच कोसळला. हेल्मेट असताना सुद्धा तो जायबंदी झालाय. त्याची स्थिती गंभीर झाली आहे.

टीम इंडियाविरुद्धच्या कसोटी क्रिकेट मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन संघ सज्ज होता. मात्र, ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे. सिडनी क्रिकेट ग्राउंडवर शेफिल्ड शिल्ड स्पर्धेदरम्यान, ऑस्ट्रेलियने फलंदाज फिल ह्युजेस यांच्या डोक्यावर बॉल बसला. त्याचवेळी तो मैदानावरच कोसळला. 

गंभीर जखमी ह्युजेसच्या डोक्यावरनं शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. मात्र, तो कोमात गेलाय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.