नवी दिल्ली : नुकताच टेस्ट क्रिकेटला अलविदा करणाऱ्या कुमार संगकारा याचे ट्विटर अकाउंट हॅक झाले आहे. हॅकर्सने संगकाराच्या ट्विटरवरून काही अश्लिल फोटो पोस्ट केले आहेत.
या प्रकाराची माहिती झाल्यावर स्वतः संगकाराने आपल्या चाहत्यांची माफी मागितली आणि अकाउंट हॅक झाल्याची माहिती दिली.
यापूर्वी सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचेही ट्विटर अकाउंट हॅक झाले होते. त्याद्वारे एक अश्लिल साईटला फॉलो करण्यात आले होते. त्यानंतर तेथून अश्लिल मेसेजही पाठविले जात होते.
२०१४ मध्ये महान खेळाडून इयान बॉथमचेही ट्विटर अकाउंट हॅक झाले होते. बॉथमच्या ट्विटर अकाउंटवर एका न्यूड व्यक्तीचा फोटो पोस्ट केला होता.
Guys my twitter account has been hacked. I need to reset my account. It's unbelievable. Apologies. In the middle of a county game.
— Kumar Sangakkara (@KumarSanga2) September 2, 2015
Ignore all messages until I tweet it's ok.
— Kumar Sangakkara (@KumarSanga2) September 2, 2015
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.