मुंबई : आयपीएल १० मध्ये रविवारी रात्री झालेल्या सामन्यामध्ये किंग्स इलेवन पंजाबचा खेळाडू संदीप शर्मा अंपायरशी भिडला. आयपीएलच्या आचार संहिताच्या उल्लंघन केल्याबद्दल त्याला दोषी ठरवण्यात आलं आहे. संदीप शर्माच्या मॅच फीच्या ५० टक्के दंड लावण्यात आला आहे..
सामना सुरु असतांना संदीपच्या बॉलला अंपायरने नो बॉल दिला. यावर संदीरपने आक्षेप घेतला. वाढता वाद पाहता कर्णधार ग्लेन मॅक्सवेल देखील धावत त्या ठिकाणी आहे.
गुजरात लॉयंस विरोधात मोहालीच्या पीसीए आयएस बिंद्रा स्टेडियममध्ये खेळल्या गेलेल्या मॅचमध्ये अंपायरच्या नो बॉलच्या निर्णयावर संदीपने नाराजी दर्शवली. त्यामुळे नियम-2.1.5 नुसार त्यांच्यावर दंड लावण्यात आला आहे. संदीपने त्याची चूक स्विकारली आहे. त्यामुळे आता त्यावर कोणतीही सुनावणी नाही होणार आहे.
पाहा व्हिडिओ