ऑलिम्पिक समारोप सोहळ्यात साक्षी करणार भारताचं नेतृत्व

रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताकडून साक्षी मलिक आणि पी.व्ही.सिंधूनं मेडल्सची कमाई करत भारताची मान उंचावली

Updated: Aug 21, 2016, 09:43 PM IST
ऑलिम्पिक समारोप सोहळ्यात साक्षी करणार भारताचं नेतृत्व title=

रिओ : रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताकडून साक्षी मलिक आणि पी.व्ही.सिंधूनं मेडल्सची कमाई करत भारताची मान उंचावली. साक्षीला कुस्तीमध्ये ब्रॉन्झ तर पी.व्ही.सिंधूला बॅडमिंटनमध्ये सिल्व्हर मेडल मिळालं. 

रिओत उल्लेखनीय कामगिरी करणारी साक्षी मलिक पुन्हा एकदा भारताची मान उंचावणार आहे. रिओ ऑलिम्पिकच्या समारोप सोहळ्यामध्ये साक्षी तिरंगा हातात घेऊन भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे. 

आणखी एक मेडल मिळवण्याची शेवटची आशा असलेल्या योगेश्वर दत्तनं निराशा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. सिल्व्हर मेडल मिळवणारी पी.व्ही.सिंधू हैदराबादमध्ये येण्यासाठी रवाना झाल्यामुळे ही संधी साक्षीला मिळणार आहे. 

रिओ ऑलिम्पिकमध्ये 58 किलो वजनीगटाच्या फ्री स्टाईल कुस्तीमध्ये साक्षी मलिकला ब्रॉन्झ मेडल मिळालं.