जगात 'नंबर वन'वर पोहचली भारताची फुलराणी!

भारताची फुलराणी आणि बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल जगातील 'नंबर वन'ची बॅडमिंटन खेळाडू बनलीय.

Updated: Mar 28, 2015, 06:39 PM IST
जगात 'नंबर वन'वर पोहचली भारताची फुलराणी! title=

नवी दिल्ली : भारताची फुलराणी आणि बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल जगातील 'नंबर वन'ची बॅडमिंटन खेळाडू बनलीय.

सर्वोच्च पदावर पोहचलेली सायना पहिलीच भारतीय महिला खेळाडू ठरलीय. सायना हिच्यापूर्वी प्रकाश पादूकोण पुरुष वर्घात जगातील नंबर वनचे खेळाडू ठरले होते. 

इंडिया ओपनच्या सेमीफायनलमध्ये थायलंडच्या रत्चानोक इंतानोन हिच्यासमोर विश्व चॅम्पियन आणि दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या केरोलिना मेरिन हिला पराभव स्वीकारावा लागलाय. इंतानोन हिनं हा सामना २१-१९, २१-२३, २२-२० अशा फरकानं जिंकलाय.   

केरोलिनाच्या पराभवामुळेच सायनाला नंबर वन पदावर पोहचण्याची संधी मिळालीय. आता सायनाचा सामना सेमीफायनलमध्ये जपानच्या यूई हाशिमोतो हिच्याशी होणार आहे. 

टूर्नामेंट सुरू होण्यापूर्वी सायना वर्ल्ड रॅकिंगमध्ये चीनच्या झुरुई हिच्याहून एक स्थान मागे पडली होती. तर शिजियान वांग तिसऱ्या आणि मेरिन चौथ्या स्थानावर होती. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.