22 वर्षांपूर्वी याच दिवशी सचिनने ठोकले होते पहिले शतक

भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर क्रिकेटमधून निवृत्त झाला असला तरी त्याच्या खेळी क्रिकेट रसिकांच्या आजही लक्षात आहेत.

Updated: Sep 9, 2016, 01:50 PM IST
22 वर्षांपूर्वी याच दिवशी सचिनने ठोकले होते पहिले शतक title=

मुंबई : भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर क्रिकेटमधून निवृत्त झाला असला तरी त्याच्या खेळी क्रिकेट रसिकांच्या आजही लक्षात आहेत.

22 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी सचिन तेंडुलकरने वनडे क्रिकेटमध्ये आपले पहिलेवहिले शतक ठोकले होते. 9 सप्टेंबर 1994मध्ये त्याने हे शतक झळकावले. 

पहिले शतक ठोकण्यासाठी 78व्या सामन्यापर्यंत त्याला थांबावे लागले. मात्र त्यानंतर सचिन काही थांबलाच नाही. 

सचिनने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत 49 वनडे शतक झळकावलीत. पाहा त्याचे पहिले शतक