सचिननं त्यांच्याबरोबर साजरा केला वाढदिवस

मास्टर-ब्लास्टर सचिननं आपला 43 वा वाढदिवस साजरा केला. त्यानं आपला वाढदिवस एमआयजी क्रिकेट क्लबमध्ये शाळेच्या विद्यार्थ्यांबरोबर क्रिकेट खेळत साजरा केला.

Updated: Apr 24, 2016, 10:45 PM IST
सचिननं त्यांच्याबरोबर साजरा केला वाढदिवस title=

मुंबई: मास्टर-ब्लास्टर सचिननं आपला 43 वा वाढदिवस साजरा केला. त्यानं आपला वाढदिवस एमआयजी क्रिकेट क्लबमध्ये शाळेच्या विद्यार्थ्यांबरोबर क्रिकेट खेळत साजरा केला. मेक-अ-विश-इंडिया या संस्थेनं हा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यानं या उगवत्या क्रिकेटपटूंना बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंगचे धडे दिले. 

सचिनला आदर्श मानूनच अनेक खेळाडू आपला कल क्रिकेटकडे वळवतात. आणि त्यात सचिननं स्वत:च या विद्यार्थ्यांना क्रिकेटचे धडे दिल्यामुळे या विद्यार्थ्यांना आपला आनंद लपवता आला नाही. 2013 मध्ये क्रिकेटला सचिननं अलविदा केला होता. मात्र, त्याची लोकप्रियता जराही कमी झालेली नाही.