मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरबाबत आश्चर्यकारक खुलासा टीम इंडियाचे माजी कर्णधार आणि व्यवस्थापक अजित वाडेकर यांनी केला आहे. वाढदिवसाच्यावेळी सचिन तेंडुलकरने सहा बॅले डान्सर आणल्या होत्या. मात्र, ही घटना आहे न्यूझीलंडमधील १९९४ची.
न्यूझीलंडच्या दौर्यावर असताना आपल्या ५३ व्या वाढदिवशी खोडकर स्वभावाच्या सचिन तेंडुलकरने जवळपास सहा बॅले डान्सर आणून धमाल उडवून दिली. क्रिकेट क्लब ऑफ इंडियाच्या एका कार्यक्रमात वाडेकरांनी आपल्या वाढदिवसाची आठवण जागवली.
सचिन तेंडुलकरने दोन दिवसांपूर्वीच ४२ वा वाढदिवस साजरा केला. या वाढदिवसानिमित्त एका कार्यक्रमात वाडेकरांनी सचिनच्या काही मिश्कील आठवणीही सांगितल्या. त्यांना न्यूझीलंडमधील हा किस्सा आहे. एक एप्रिलला माझा वाढदिवस असतो. एके दिवशी सराव केल्यानंतर आम्ही सगळे आपापल्या खोलीत झोपलो होतो.. पुढच्या दिवशी एप्रिल फूल होते आणि माझा वाढदिवसही. मी गाढ झोपेत असताना मध्यरात्री सचिनने माझ्या खोलीचा दरवाजा ठोठावला होता. तेव्हा तो फारच गंभीर दिसत होता.
मी सचिनला विचारले, काय झाले? तो म्हणाला, कपिल देवची तब्येत ठीक नाही, मी कोणत्याही क्षणाचा विलंब न करता, पायजामा परिधान केला आणि दुसर्या मजल्यावर असलेल्या कपिलच्या खोलीत गेलो. खोलीत कपिल केक आणि शॅम्पेनच्या बाटली घेऊन उभा होता. त्यापेक्षा मोठा धक्का दुसर्या खोलीतून सहा बेले डान्सर्स आल्या आणि माझ्या आजुबाजूला नाचायला लागल्या. या कार्यक्रमाची कल्पना सचिनची होती, असे वाडेकर म्हणालेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.