खेळामध्ये हरलात तरी इतरांची मनं जिंका - सचिन

'आयआयटी मुंबई क्रीड़ा संकुला'त आयआयटीच्या ५० व्या वार्षिक क्रीडा महोत्सवाचं उद्घाटन मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी तरुण खेळाडूंना सचिनने काही कानमंत्रही दिलेत. 

Updated: Dec 13, 2014, 08:58 AM IST
खेळामध्ये हरलात तरी इतरांची मनं जिंका - सचिन title=

मुंबई : 'आयआयटी मुंबई क्रीड़ा संकुला'त आयआयटीच्या ५० व्या वार्षिक क्रीडा महोत्सवाचं उद्घाटन मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी तरुण खेळाडूंना सचिनने काही कानमंत्रही दिलेत. 

‘खेळातून मी खूप काही शिकलो... एखाद्या गोष्टीसाठी तैयार कसं व्हावं, त्याचं प्लानिंग आणि ते प्रत्यक्षात कसं उतरवावं हे मी खेळातून शिकलो...’ असे काही सल्ले सचिननं नवोदित खेळाडूंना दिलाय. 

‘नेहमी प्रतिस्पर्ध्यांचा आदर करायला शिका. कारण इथे प्रत्येकाला जिंकायचं असतं. जरी तुम्ही हरलात तरी इतरांची मन जिंका...’ असं म्हणत सचिननं आपला अनुभव उपस्थितांशी शेअर केला. 

खेळ अपयश पचवण्याची ताकद आपल्याला देतो आणि पुन्हा नव्या जोमाने उभा राहायला शिकवतो... असंही सचिननं यावेळी म्हटलंय. यावेळी, भारतातील विविध भागांतून आलेल्या 'आयआयटी'च्या खेळाडूंनी फ्लॅग मार्च करून सचिनला मानवंदना दिली. 

१२ ते १९ डिसेंबरपर्यंत हा क्रीड़ा महोत्सव 'आयआयटी'मध्ये रंगणार आहे. या महोत्सवासाठी संपूर्ण भरतातून 'आयआयटी'च्या जवळपास ३००० खेळाडूंनी सहभाग नोंदवलाय. तर जवळपास २०० क्रीडा प्रकारांचा या महोत्सावात समावेश केला गेलाय.   

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.