दहाही आयपीएलमध्ये ३००हून अधिक धावा करणारा रोहित ठरलाय दुसरा फलंदाज

मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने आयपीएलमध्ये आणखी एक विक्रम केलाय. आयपीएलच्या सर्व दहा हंगामात ३००हून अधिक धावा करणारा तो दुसरा फलंदाज ठरलाय. तर हा विक्रम करणारा रोहित मुंबई इंडियन्समधील पहिला क्रिकेटपटू ठरलाय. 

Updated: May 20, 2017, 04:39 PM IST
दहाही आयपीएलमध्ये ३००हून अधिक धावा करणारा रोहित ठरलाय दुसरा फलंदाज title=

मुंबई : मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने आयपीएलमध्ये आणखी एक विक्रम केलाय. आयपीएलच्या सर्व दहा हंगामात ३००हून अधिक धावा करणारा तो दुसरा फलंदाज ठरलाय. तर हा विक्रम करणारा रोहित मुंबई इंडियन्समधील पहिला क्रिकेटपटू ठरलाय. 

या यादीत सुरेश रैना पहिल्या स्थानी आहे. सोमवारी कर्णधार शर्माने आयपीएलमधील  ४००० धावा पूर्ण केल्या. इतक्या धावा पूर्ण करणारा रोहित शर्मा रैना, कोहली आणि गंभीरनंतर चौथा फलंदाज ठरलाय. आयपीएलमधील सर्वाधिक धावा सध्या रैनाच्या नावावर आहेत. 

तब्बल सहा महिन्यांनी आयपीएलद्वारे रोहितने क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. सोमवारी झालेल्या पुणेविरुद्धच्या सामन्यात त्याने ३९ चेंडूत ५८ धावा ठोकल्या होत्या.