भारताकडून अफगाणिस्तानचा १५३ धावांनी पराभव

रोहित शर्मा याच्या धडाकेबाज १५० धावांच्या जोरावर भारताने अफगाणिस्तान विरूद्धच्या सराव सामन्यात ५ बाद ३६४ धावांची मजल मारली. अॅडलेड ओव्हल मैदानावर सुरू असलेल्या सामान्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. 

Updated: Feb 10, 2015, 05:37 PM IST
भारताकडून अफगाणिस्तानचा १५३ धावांनी पराभव title=

अॅडलेड :  भारताच्या ३६४ धावांचा पाठलाग करताना अफगाणिस्तानचा संघाला केवळ २११ धावांपर्यंतच मजल मारता आली. यात त्यांनी ८ गडी गमावले. भारताने अफगाणिस्तानवर १५३ धावांनी पराभव केला. 

भारताकडून मोहित शर्मा आणि रविंद्र जडेजा यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या तर उमेश यादव, अश्विन आणि रैना यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. अफगाणिस्तानकडून नवरोज मंगल याने सर्वाधिक ६० धावा केल्या. उस्मान गनी याने ४४ धावांची खेळी केली. 

रोहित शर्मा याच्या धडाकेबाज १५० धावांच्या जोरावर भारताने अफगाणिस्तान विरूद्धच्या सराव सामन्यात ५ बाद ३६४ धावांची मजल मारली. अॅडलेड ओव्हल मैदानावर सुरू असलेल्या सामान्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. 

 

 

अफगाणिस्तानच्या ओपनिंग गोलंदाज हामीद हसन आणि दौलत झीदान यांनी जबरदस्त गोलंदाजी करून शिखर धवन (४) आणि विराट कोहली (5) यांना स्वस्तात माघारी परतवले. त्यामुळे भारताची स्थिती २ बाद १६ अशी झाली होती. त्यानंतर रोहीत शर्मा आणि सुरेश रैना यांननी १५८ धावांची भागीदारी करत भारतीय संघाला भक्कम स्थिती प्राप्त करून दिली. त्यानंतर शेवटच्या षटकांमध्ये रोहित शर्मा आणि अजिंक्य राहाणे यांनी तडाखेबंद फलंदाजी करत भारताला ३६५ धावांपर्यंत मजल मारून दिली. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.