पाकच्या रियाज वहाबने सूचवले ऑस्ट्रेलियाला हरविण्याचे उपाय

पाकिस्तान जरी वर्ल्ड कपच्या क्वार्टर फायनलमधून बाहेर पडला असला तरी, जाता जाता पाकिस्तानच्या वहाब रियाजने ऑस्ट्रेलियाला हरवण्यासाठी उपयुक्त अशा काही गोष्टी भारताला सांगून गेला आहे. आता पहावं लागेल वहाबने दाखवलेल्या उपायांवर भारत किती काम करतो.

Updated: Mar 25, 2015, 06:36 PM IST
पाकच्या रियाज वहाबने सूचवले ऑस्ट्रेलियाला हरविण्याचे उपाय title=

सिडनी : पाकिस्तान जरी वर्ल्ड कपच्या क्वार्टर फायनलमधून बाहेर पडला असला तरी, जाता जाता पाकिस्तानच्या वहाब रियाजने ऑस्ट्रेलियाला हरवण्यासाठी उपयुक्त अशा काही गोष्टी भारताला सांगून गेला आहे. आता पहावं लागेल वहाबने दाखवलेल्या उपायांवर भारत किती काम करतो.

२० मार्चच्या त्या ऑस्ट्रेलिया-पाकिस्तान मॅचमधील वहाब रियाजचा तो थरारक स्पेल सर्वांनाच आठवत असेल. वहाबने शेन वॉटसन सारख्या आक्रमक बॅट्समनला आपल्या उसळत्या बाऊंसरने गारद केले होते. वहाबचा तो स्पेल सर्वांनाच स्मरणात राहील. वहाबच्या त्या उसळत्या बाऊंर्सनी ऑस्ट्रेलियाला नाकी नऊ आणले होते.

भारतीय टीमनेही हेच करणे अपेक्षित आहे. बाऊंसरने ऑस्ट्रेलियावर आक्रमण केले पाहिजे. वेळ पडली तर स्लेजिंजसुद्धा केली पाहिजे.

युरोपिय बॉलर्स त्यांच्या वेग आणि बाऊंसरच्या जोरावर आशियाई बॅट्समनवर आक्रमण करतात. मात्र युरोपियन बॅट्समनलासुद्धा बाऊंसरने त्रास दिला जाऊ शकतो हे वहाबने दाखवून दिले आहे, आणि तसा हल्ला करण्यासाठी भारताकडे तसे बॉलर्सही उपलब्ध आहेत.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.