रिओ : जमैकाचा सुप्रसिद्ध धावपटू उसैन बोल्टने ऑलिम्पिकचा शेवट वादाने केला आहे. एका २० वर्षीय मुलीसोबत त्याचे काही आपत्तीजनक फोटो समोर आले असून ते सोशल मीडियावर आगीसारखे पसरत आहेत.
रिओ येथे राहणारी ही विद्यार्थीने जेडी दुराते हीने स्वतः व्हाट्सअॅपवर आपले फोटो शेअर केले आहे. यात बोल्ट आणि ती एका बेडवर दिसत आहे.
२१ ऑगस्ट रोजी रिओमध्ये क्लोझिंग सेरेमनी झाली. संयोगाने या दिवशी बोल्टचा ३० वा वाढदिवस होता. जेडीने जे फोटो शेअर केले आहे, त्यात एकात बोल्ट तिला किस करतोय आहे. आपल्या फोटोबद्दल ती म्हणाली बोल्ट आणि माझ्यामध्ये जे काही झालं ते अत्यंत नॉर्मल होते. मला कधीच वाटले नाही की तो एक फेमस अॅथलिट आहे.
बोल्ट आपल्या ३० व्या बर्थ डेच्या संपूर्ण रात्रभर पार्टी करत होता. या पार्टीत तो जेडी सह अन्य मुलींसोबत डान्स करताना दिसला होता. विशेष म्हणजे हे फोटो व्हायरल होण्यापूर्वी एक दिवस अगोदर बोल्ट आपल्या गर्लफ्रेंडमुळे चर्चेत होता.
बोल्टच्या गर्लफ्रेंडचे नाव कासी बॅनेट आहे. बोल्ट आणि कासी यांचा पहिला फोटो न्यू किंगस्टनमध्ये एका इव्हेंटमध्ये समोर आला होता. बोल्टने गोल्ड मेडल मिळवत होता. तेव्हा एक फोटो शेअर करत गर्लफ्रेंडने माय बेबी म्हणून त्याला चिअर केले होते.
यापूर्वी रिओच्या ओपनिंग सेरमनीनंतर बोल्ट वादात आला होता. ब्राझीलच्या डान्सरसोबत सांबा डान्सचा एक व्हिडिओ व्हायल झाला