ब्राव्हो!!! रजत पदक पटकावून दीपानं पॅरालम्पिकमध्ये रचला इतिहास

भारताची दीपा मलिकनं सोमवारी इतिहास रचलाय. पॅरालम्पिकमध्ये गोळाफेकीत एफ-५२ मध्ये रजत पदक पटकावून दीपा हे पदक मिळवणारी देशातील पहिला महिला खेळाडू बनलीय.

Updated: Sep 13, 2016, 01:15 PM IST
ब्राव्हो!!! रजत पदक पटकावून दीपानं पॅरालम्पिकमध्ये रचला इतिहास title=

रिओ दि जेनेरिओ : भारताची दीपा मलिकनं सोमवारी इतिहास रचलाय. पॅरालम्पिकमध्ये गोळाफेकीत एफ-५२ मध्ये रजत पदक पटकावून दीपा हे पदक मिळवणारी देशातील पहिला महिला खेळाडू बनलीय.

दीपानं आपल्या सहा प्रयत्नांत सर्वश्रेष्ठ ४.६१ मीटर लांब गोळा फेकला आणि रजत पदक पटकावलं. यानंतर रिओ पॅरालम्पिकमध्ये भारताच्या खात्यात तीन पदक जमा झालेत.

सेना अधिकाऱ्याची पत्नी आणि दोन मुलांची आई 

यानंतर, हरियाणा सरकारच्या योजनेंतर्गत दीपाला तब्बल चार करोड रुपयांचा पुरस्कार मिळणार आहे. दीपाच्या कंबरेखालचा भाग लकवाग्रस्त आहे. ती सेना अधिकाऱ्याची पत्नी आणि दोन मुलांची आई आहे. 

१७ वर्षांपूर्वी मणक्यातील ट्युमरच्या कारणामुळे तिचं चालणंही कठिण होऊन बसलं होतं. तिच्यावर तब्बल ३१ शस्त्रक्रिया करण्यात आल्या. तिच्या कंबर आणि पायांदरम्यान १८३ टाके घातले गेले होते.