रिओ ऑलिम्पिक २०१६ : जिमनॅस्ट दीपा करमाकरनं रचला इतिहास

भारतीय जिमनॅस्ट दीपा करमाकरनं फायनल गाठत इतिहास रचलाय.

Updated: Aug 8, 2016, 09:36 AM IST
रिओ ऑलिम्पिक २०१६ : जिमनॅस्ट दीपा करमाकरनं रचला इतिहास  title=

रिओ : भारतीय जिमनॅस्ट दीपा करमाकरनं फायनल गाठत इतिहास रचलाय.

ऑलिम्पिकमध्ये फायनल गाठणारी ती पहिला भारतीय जिमनॅस्ट ठरली आहे. दीपानं प्रोडुनोव्हा वॉल्ट प्रकारात आठवा क्रमांक पटकावला.

तिनं १४.८५० पॉईंट्स कमाई करत फायनलमध्ये दिमाखात प्रवेश केला. दीपानं फायनल गाठत इतिहास रचला. 

आता दीपा करमाकर १४ ऑगस्टला भारताला जिमनॅस्टीकमध्ये पहिलं ऑलिम्पिक मेडल पटाकवून देण्यासाठी आतूर असेल.