मुंबई : टीम इंडियाला टेस्टमध्ये अव्वल स्थान मिळवण्यात सिंहाचा वाटा उचलणा-या ऑफ स्पिनर आर. अश्विनच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेलाय. आयसीसी क्रिकेटर ऑफ द इयर आणि आयसीसी टेस्ट क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कारानं अश्विनचा गौरव करण्यात आले आहे.
क्रिकेटर ऑफ द इयर हा मानाचा पुरस्कार मिळवणारा अश्विन हा तिसरा भारतीय क्रिकेटर ठरलाय. याआधीही हा प्रतिष्ठेचा पुरस्कार सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड यांना मिळाला होता. टेस्ट क्रिकेटमधील कामगिरीसाठी आयसीसी टेस्ट क्रिकेटर ऑफ इ इयर हा पुरस्कारही अश्विननं पटकावला आहे.
12 मॅचमध्ये 72 विकेट घेण्याची किमया त्यानं साधलीय. याच कामगिरीची दखल घेऊन आयसीसीने त्याला हा पुरस्कार दिलाय.. याआधी राहुल द्रविड आणि गौतम गंभीर यांनी हा पुरस्कार पटकावला होता. टेस्टमधील कामगिरीनंतर आर. अश्विनसाठी हे नवीन वर्षाचं गिफ्टच आहे.