अश्विन सर्वात जलद १५० विकेट घेणारा भारतीय

 भारतीय दिग्गज ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विन भारतासाठी सर्वात जलद १५० विकेट घेणारा गोलंदाज झाला आहे. अश्विनने पंजाब क्रिकेट संघच्या मैदानावर सुरू असलेल्या कसोटी सामन्यात शुक्रवारी ५१ धावा देऊन पाच विकेट घेतल्या. 

Updated: Nov 6, 2015, 05:23 PM IST
अश्विन सर्वात जलद १५० विकेट घेणारा भारतीय title=

मोहाली :  भारतीय दिग्गज ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विन भारतासाठी सर्वात जलद १५० विकेट घेणारा गोलंदाज झाला आहे. अश्विनने पंजाब क्रिकेट संघच्या मैदानावर सुरू असलेल्या कसोटी सामन्यात शुक्रवारी ५१ धावा देऊन पाच विकेट घेतल्या. 

या पाच विकेटसह अश्विनने भारतात १०० आणि एकूण १५० विकेट घेण्याचा टप्पा पार केला. त्याने आपल्या २९ व्या सामन्यात हा कारनामा करून दाखविला आहे. 

सर्वात कमी सामन्यात १५० विकेट घेणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. यापूर्वी इरापल्ला प्रसन्ना आणि अनिल कुंबळे यांनी ३४ सामन्यांमध्ये १५० विकेट घेतल्या होत्या. 

जागतिक स्तरावर अश्विन टेस्ट मॅचमध्ये १५० विकेट घेणाऱ्यांच्या यादीत चौथ्या स्थानावर पोहचला आहे. 

जागतील स्तरावर सर्वात कमी समान्यात १५० विकेट घेणाऱ्यामंध्ये सर्वात प्रथम नाव सिडनी बर्न्स याचे आहे. त्याने २४ सामन्यात १५० विकेट घेतल्या आहे. त्यानंतर दुसरा क्रमांक वकार युनिसचा लागतो, त्याने २७ सामन्यात ही कामगिरी केली होती. त्यानंतर तिसऱ्या स्थानावर ग्रिमेट यांचा आहे त्याने २८ सामन्यात हा आकडा पार केला आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.