राफाएल नदाल ऑस्ट्रेलियन ओपनमधून बाहेर

ऑस्ट्रेलियन ओपनच्या पहिल्याच राऊंडमध्ये स्पेनच्या राफाएल नदालला आपला गाशा गुंडाळावा लगाला. त्याला आपल्या देशाच्या फर्नांडो वर्दास्कोकडून पराभव स्वीकारावा लागला. 

PTI | Updated: Jan 19, 2016, 10:00 PM IST
राफाएल नदाल ऑस्ट्रेलियन ओपनमधून बाहेर title=

सिडनी : ऑस्ट्रेलियन ओपनच्या पहिल्याच राऊंडमध्ये स्पेनच्या राफाएल नदालला आपला गाशा गुंडाळावा लगाला. त्याला आपल्या देशाच्या फर्नांडो वर्दास्कोकडून पराभव स्वीकारावा लागला. 

वर्दाल्कोनं पाच सेटममध्ये रंगेलल्या मॅचममधअये बाजी मारली. वर्दास्कोनं नदालवर 7-6, 4-6, 3-6, 7-6, 6-2 मात केली. दुखापतग्रस्त नदालला पहिल्या राऊंडमधून एक्झिट घ्यावी लागेल याची कल्पनाही कोणीच केली नव्हती. 

स्पॅनियार्ड जायंट ऑस्ट्रेलियन ओपनमधून आऊट झालाय. त्याच्यापासून सीडेड टेनिसपटूंची या टुर्नामेंटमधून अर्ली एक्झिटची मालिका सुरु झाली आहे.