चेन्नई : भारतीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडू अभिमन्यू मिथून लवकरच 'एन्गेज्ड' होणार आहे. दक्षिण भारतीय राधिकाची मुलगी रायने राधिका हिच्यासोबत लवकरच विवाहबद्ध होणार आहे.
राधिकाच्या कुटुंबियांच्या जवळच्या एका सूत्रानं दिलेल्या माहितीनुसार, अभिमन्यू आणि रायने हे दोघे २३ सप्टेंबर रोजी साखरपुडा करणार आहे. अभिमन्यू आणि रायने यांच्या विवाहाची तारीख अजून पक्की झालेली नाही.
हे जोडपं गेल्या अनेक दिवसांपासून एकमेकांच्या प्रेमात आहे... आणि आता दोघांच्या कुटुंबियांनीही त्यांच्या या नात्याला पसंती दर्शवलीय. त्यानंतर आता हे जोडपं विवाहबंधनात अडकणार आहे.
मिथून आयपीएलमध्ये रॉयल बंगळुरुकडून खेळताना दिसला होता. तसंच त्यानं काही एक दिवसीय आंतरराष्ट्रीय मॅचमध्ये भारताचं प्रतिनिधित्वही केलंय. तर रायने ही सध्या आपल्या आईसोबत फिल्म प्रोडक्शनच्या कामात व्यस्त आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.