वर्ल्डकप क्वार्टर फायनलमध्ये कोण कुणासोबत लढणार?

ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये खेळल्या जात असलेल्या वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेचे क्वार्टर फायनलचे सामने कोणत्या दोन देशांमध्ये होणार आहेत, हे स्पष्ट झालं आहे.

Updated: Mar 15, 2015, 08:23 PM IST
वर्ल्डकप क्वार्टर फायनलमध्ये कोण कुणासोबत लढणार? title=

सिडनी : ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये खेळल्या जात असलेल्या वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेचे क्वार्टर फायनलचे सामने कोणत्या दोन देशांमध्ये होणार आहेत, हे स्पष्ट झालं आहे.

वर्ल्डकपच्या इतिहासात पहिल्यादा आशियाच्या चार टीम क्वार्टर फायनलमध्ये पोहचल्या आहेत, यात भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेशचा समावेश आहे.

१८ मार्च पासून या सामन्यांना सुरूवात होणार आहे. हे सामने सलग १८, १९, २० आणि २१ मार्च रोजी खेळले जाणार आहेत.

The knockout stage is set. Who will win #cwc15? pic.twitter.com/TytdjW6K9X

— ICC (@ICC) March 15, 2015

पूल बी मधील आघाडीची टीम इंडिया क्वार्टर फायनलमध्ये १९ मार्च रोजी बांगलादेशचा सामना करणार आहे, तर पाकिस्तान २० मार्च रोजी अॅडलेडमध्ये ऑस्ट्रेलियासोबत खेळणार आहे.
सिडनीत खेळल्या जाणाऱ्या पहिल्या क्वार्टर फायनल सामन्याचा विजेता सेमीफायनलमध्ये न्यूझीलंड आणि वेस्टइंडिज यांच्यातील सामन्यात विजयी संघासोबत खेळणार आहे.

फायनल २९ मार्च रोजी मेलबर्नमध्ये होणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.