नवी दिल्ली : टी २० क्रिकेट टूर्नामेंटच्या फायनलमध्ये रविवारी भारत विरुद्ध बांग्लादेश मॅच रंगणार आहे... पण, याचदरम्यान बांग्लादेशी फॅन्सनं किळसवाणं आणि हीन पद्धतीनं प्रदर्शन केलंय.
उद्या सायंकाळी ७ वाजता भारत आणि बांग्लादेश दरम्यान आशिया कप २०१६ चा फायनल मुकाबला रंगणार आहे. याआधी एका बांग्लादेशी फॅननं फोटोशॉपनुसार, बांग्लादेश बॉलर तस्कीन अहमद यानं आपल्या हातात भारतीय कॅप्टन एम एस धोनी याचं कापलेलं शिर धरलंय, असं या फोटोमध्ये दाखवण्यात आलंय.
बांग्लादेश फॅन्सनं केलेल्या किळसवाण्या प्रकारामुळे भारतीय फॅन्स खवळण्याची चिन्ह आहेत.
गेल्या वर्षी वनडे सीरिजमध्ये धोनीनं मुस्ताफिजुर रहमानला दिलेला धक्का बांग्लादेशी फॅन्सच्या अजून डोक्यातून गेलेला दिसत नाहीय. यापूर्वीही बांग्लादेशी फॅन्सनं अशा हरकती केल्या होत्या.
गेल्या वर्षी भारत - बांग्लादेश वन डे सीरिज दरम्यान एका फोटोमध्ये भारतीय टीमच्या स्टार्सचे अर्धमुंडण करण्यात आल्याचं (फोटोशॉप करून) दाखवलं गेलं होतं.
परंतु, बांग्लादेशच्या टीमला आणि फॅन्सला या थिल्लरपणाचं उत्तर भारतीय टीम मात्र मैदानातच देते... हे अनेकदा दिसून आलंय.